खानापूर

खानापूरच्या युवकाची आत्महत्या;  नातेवाईकांच्या घरी गळफास

खानापूर: तालुक्यातील घस्टोळी – चन्नकेबैल येथील 25 वर्षीय युवक गजानन भैराप्पा गुरव याने रविवारी मच्छे येथे नातेवाईकांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी 8.48 ते 9 च्या सुमारास उघडकीस आली.

गजानन शनिवारी (5 जुलै) मच्छे येथील आपल्या नातेवाईकांकडे आला होता. दुसऱ्याच दिवशी त्याने घरात साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी त्याला खानापूरच्या सरकारी इस्पितळात नेले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

गजानन कर्जाच्या ओझ्याखाली दबला होता आणि अलीकडील काळात त्याला दारूचे व्यसनही लागले होते. त्यामुळे तो सतत गावोगाव फिरत होता, अशी माहिती आहे.

या घटनेबाबत गजाननचा भाऊ यल्लाप्पा गुरव याने बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून, त्याने काही संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी ही नोंद संशयास्पद मृत्यू म्हणून घेतली आहे.

पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.

A 25-year-old youth from Khanapur taluka, Gajanan Bhairappa Gurav, allegedly died by suicide at his relatives’ house in Machhe near Belagavi on Sunday morning. He was reportedly under financial stress and had developed a drinking habit recently. He visited his relatives on Saturday and was found hanging the next morning between 8:45 and 9:00 AM. Although he was rushed to Khanapur government hospital, doctors declared him brought dead. His brother has filed a complaint with Belagavi Rural Police, leading to a suspicious death case being registered. Police are investigating the incident.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या