खानापूरच्या या विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार – भारतीय सैन्यात अभिमानास्पद प्रवेश
खानापूर: तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांची भारतीय प्रादेशिक सैन्यात (TA – Territorial Army) निवड झाली असून, त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, या दोघांनी खानापूर येथील पृथ्वी इन्स्टिट्यूट येथे प्रशिक्षण घेतले आहे.

प्रशांत गोविंद सांबळे (ओलमणी, ता. खानापूर) यांची निवड 109 पायदळ वाहिनी (TA – Territorial Army), मराठा लाईट इन्फंट्री, कोल्हापूर येथे झाली आहे.

तसेच प्रवीण तुकाराम सावंत (काटगाळी, ता. खानापूर) यांचीही निवड 109 पायदळ वाहिनी (TA – Territorial Army), मराठा लाईट इन्फंट्री, कोल्हापूर येथे झाली आहे.
12 जानेवारी 2025 रोजी झालेल्या भरती परीक्षेत 1,200 विद्यार्थ्यांपैकी केवळ 59 विद्यार्थ्यांची निवड झाली. या 59 निवड झालेल्यांमध्ये पृथ्वी इन्स्टिट्यूटच्या दोन विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले, अशी माहिती पृथ्वी इन्स्टिट्यूटचे संचालक पुंडलिक गावडा-पाटील यांनी दिली.
या विद्यार्थ्यांच्या यशानंतर आज पृथ्वी इन्स्टिट्यूट तर्फे विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
पृथ्वी इन्स्टिट्यूट ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देते. विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी नंतरच्या संधींबद्दल जागरूक करण्याच्या उद्देशाने ही संस्था कार्यरत आहे.
संस्थेचे संचालक पुंडलिक गावडा आणि अझर मुल्ला यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि विद्यार्थ्यांची मेहनत महत्त्वाची भूमिका बजावते.”
जर तुम्हालाही Indian Army, CRPF, CISF, ITBP, BSF मध्ये भरती व्हायचे असेल, तर खानापूर किंवा बेळगाव येथील पृथ्वी इन्स्टिट्यूटला नक्की भेट द्या.
अग्निवीर आर्मी आणि रेल्वे ग्रुप D साठी 17 मार्च 2025 पासून नवीन बॅच सुरू होत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा, असे आवाहन संचालक पुंडलिक गावडा, अझर मुल्ला आणि विशाल सर यांनी केले आहे.
खानापूर शाखा – सरस्वती कॉम्प्लेक्स, बेलगाम-गोवा रोड, SBI बँकेसमोर, खानापूर
📞 9632873102
बेळगाव शाखा – दत्त मंदिर, आदर्श हॉस्पिटल समोर, बेळगाव
📞 9632873102
पृथ्वी इन्स्टिट्यूटमध्ये परीक्षा-केंद्रित वर्ग, अनुभवी शिक्षक, विशेष अभ्यासक्रम, दररोज ऑनलाईन आणि ऑफलाईन चाचण्या तसेच वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे.