खानापूर

गावामधे आपापसात भांडण तंटा न करता सामोपचाराने विषय मिटवा : डॉ. अंजलीताई निंबा़ळकर

खानापूर: हिरेहट्टीहोळी येथे काही ग्रामस्थ व मेंबर गेले 3-4 दिवस पंचायत समोर उपोषणाला बसले होते. विषय होता रोड,गटर आणि जमिनीचा.  याबाबतची माहिती माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना माहिती मिळताच त्यांनी  खानापूर तहसिलदार यांना हिरेहट्टीहोळी येथे जाऊन उपोषणा संदर्भात चर्चा करून विषय मिटविण्यास सांगितले होते.

त्यानंतर तातडीने खानापूर तहसिलदार, तालुका पंचायत ईओ, पीडीओ, पीएसआय खानापूर, तसेच ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष महादेव कोळी, सुरेश भाऊ, संगाप्पा वाली, तोहीद चांदखन्नावर, अशोक अंगडी आदी मंड़ळी हिरेहट्टीहोळी येथे जाऊन उपोषण कर्त्यांसोबत सर्व विषयांवर चर्चा केली.  

यावेळी पचंयात अध्यक्ष लावगी यांनी पंचायतची बाजू सर्वासमोर मांडली. शेवटी तहसिलदार यांनी सकारात्मक चर्चा घडवून विषय मार्गी लावून देतो असे सांगून उपोषण कर्त्यांची समजूत काढली. शेवटी उपोषण मागे घेण्यात आले.

माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी गावात भाडंणतंटा होऊ नये यासाठी तातडीने तहसिलदारांशी बोलून उपोषण मिटविण्यात पुढाकार घेतल्याने गावकऱ्यांनी आभार मांडले.

यावेळी  हिरेहट्टीहोळी येथील ग्रामस्थ, पंचायत सदस्य, पंचमंडळी, कॉंग्रेस चे पदाधिकारी, तसेच सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते