हलगा महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धारासाठी समितीची निवड, बैठकीत महत्त्वाचे ठराव मंजूर
हलगा: महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, सोमवारी (24 मार्च 2025) ग्रामस्थांची बैठक पार पडली. या बैठकीत विविध ठराव मंजूर करण्यात आले आणि समितीची अधिकृत घोषणा करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी रणजित पाटील यांची निवड झाली असून, कार्याध्यक्ष म्हणून सुनिल पाटील, तर उपाध्यक्षपदी रमेश पु. गुरव आणि अप्पाणा इश्राण यांची निवड करण्यात आली. सेक्रेटरी म्हणून अनंत फटाण आणि रामचंद्र सुतार यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली, तर खजिनदारपदी नागेशी फटाण आणि रमेश अ. गुरव यांची नियुक्ती करण्यात आली.

सदस्य म्हणून गंगाराम फटाण, नागेश पाटील, लक्ष्मण बिस्टेकर, परशराम ईश्राण, महाबळेश्वर पाटील, विठ्ठल गुरव, तुकाराम फटाण, लक्ष्मण गुरव, मारुती फटाण, महादेव पाटील, भरमाणी फटाण, दीपक सुतार, ओमाणा केसरेकर, विजय ईश्राण, नारायण होणावर, जोतिबा शिंदे, वसंत सुतार, प्रमोद सुतार आणि गणपती मादार यांची निवड करण्यात आली आहे. मीडिया प्रमुख म्हणून ज्ञानेश्वर सनदी आणि रोहित ईश्राण यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
याशिवाय, हिशोब तपासणीसाठी टी. ल. सुतार, मारुती गुरव, संजय ईश्राण, पुंडलिक पाटील, महाबळेश्वर गावडू पाटील आणि लक्ष्मण रुपण यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी समिती लवकरच कामाला सुरुवात करणार असून, यासाठी आवश्यक निधी संकलन आणि नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.