खानापूर
मेरडा येथील तरुणीची ठाणे शहर पोलीस पदी निवड
खानापूर: मूळ गाव मेरडा सध्या राहणार महाबळेश्वर येथील तरुणी कुमारी करूणा ज्ञानेश्वर पाटील हीची महाराष्ट्र पोलिसात निवड झाली असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
करूणा हिचे वडील ज्ञानेश्वर पाटील हे लहानपणापासूनच गाव सोडून बाहेरगावी गवंडी कामाला आहेत. ज्ञानेश्वर व त्यांच्या पत्नी दोघेही गवंडी काम करतात. लहानपणी आई-वडील सोडून गेले कोणाचा आधार नसलेल्या ज्ञानेश्वर पाटील यांना गावात राहायला घर नाही, अशातच गावचे देवधर्म, गोंधळ ,जत्रा याला ते नियमित हजर असतात याचेच पुण्य त्यांना लाभले असून आई दुर्गादेवीच्या आशीर्वादाने व करूणा हिने कठीण परिस्थितीत घेरलेल्या मेहनतीने आज तीची पोलीस पदी निवड झाली आहे. याचा सार्थ अभिमान मेरडा वासियांना व समस्त पाटील कुटुंबीयांना आहे.


