खानापूर
कौंदल येथे जंगली शिकार करणाऱ्यावर कारवाई
खानापूर : वनविभागाने खानापूर तालुक्यातील कौंदल गावात छापा टाकत बेकायदेशीररीत्या साठवलेले जंगली मेंढीचे मांस आणि शस्त्रसाठा जप्त केला. ही कारवाई सुशांत पाटील यांच्या घरावर करण्यात आली.
या कारवाईदरम्यान तीन किलो शिजवलेले आणि कच्चे जंगली मेंढीचे मांस जप्त करण्यात आले. याशिवाय एक बंदूक, चाकू आणि कोयता अशी धारदार शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई साहाय्यक वनसंरक्षक सुनीता निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल श्रीकांत पाटील यांच्या पथकाने केली. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांसह संशयिताला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या कारवाईत साहाय्यक वनक्षेत्रपाल देवमाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.