खानापूर तालुक्यातील कारलगा येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सोहळा

खानापूर: कारलगा येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सोमवार, १७ फेब्रुवारी २०२५ ते मंगळवार, १८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान संपन्न होणार आहे.
या निमित्ताने विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, सोमवार, १७ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ८ वाजता ह. भ. प. श्री ब्रह्मचैतन्य सद्गुरु विठ्ठल दादा तात्यासाहेब वासकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे.
हा पवित्र सोहळा श्री श्रीमंत जगद्गुरु चैतन्य श्री तुकाराम महाराज यांचे विद्या वंशज श्री श्रीमंत ब्रह्मचैतन्य सद्गुरु श्री तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज पंढरपूर यांच्या कृपाशीर्वादाने संपन्न होत आहे.
खानापूर तालुक्यातील सर्व वारकरी संप्रदायातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या गुरुप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

