खानापूर

जामगावच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून केली रस्त्याची डागडुजी

खानापूर: तालुक्याच्या शिरोली पंचायत हद्दीतील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यंदाच्या मुसळधार पावसामुळे जामगाव गावचा रस्ता पूर्णपणे खचून गेला असून ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे व चिखल साचला आहे. हा रस्ता खराब झाल्याने गावात बस व इतर वाहनांना येण्या जाण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. याचबरोबर गावातील विद्यार्थी व नागरीकांना गावाबाहेर जाण्यास देखील त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यावर मुरूम टाकताना गावातील नागरिक

हे सर्व पाहून गावकऱ्यांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वखर्चाने व श्रमदानाने या रस्त्याची डागडुजी करून सध्या रस्ता वाहतुकीस योग्य करून घेतला आहे.

यावेळी गावातील अप्पू गावकर, मारुती गावकर, रामा कणकुमकर, नारायण गावकर आदी उपस्थित होते.

Jamgav Khanapur

Shiroli Panchayat Area

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते