खानापूर

खानापूर: या गावच्या युवकाने केली घरफोडी, पोलिसांकडून अटक 

खानापूर: गेल्या रविवार दि. 11 ऑगस्ट रोजी नारायण कळसेकर देसूर यांच्या घरी चोरीची घटना घडली होती. यासंबंधी मंगळवार दि. 13 ऑगस्ट रोजी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. 

याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला यावेळी सीसीटीव्ही आणि आदी पुरव्यामुळे हलशी ता. खानापूर येथील महादेव नारायण धामणेकर (वय 27)  या तरुणाला अटक करण्यात आले.

त्याच्याकडून सुमारे 6 लाख रुपये किमतीचे सोन्या- चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. यामधे 91 ग्रॅम सोने, 400 ग्रॅम चांदी असा एकूण 6 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. या तरुणाने कोल्हापुरातही चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.

महादेवने देसूर व कोल्हापूर येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे. महादेवला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी, उपनिरीक्षक आदित्य राजन आदींनी ही कारवाई केली.

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?