खानापूर

रावसाहेब वागळे कॉलेजची तालूकास्तरीय क्रीडास्पर्धेत धडाकेबाज कामगिरी

खानापूर: नुकत्याच इटगी येथे झालेल्या पदवीपूर्व महाविद्यालयीन तालुकास्तरीय क्रीडास्पर्धेत लोकमान्य सोसायटी संचालित रावसाहेब वागळे कॉलेजने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कौतुकास्पद कामगिरी करून अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन घडविले.

सांघिक क्रीडाप्रकारात मुलांच्या व्होलिबॉल संघाने प्रथम क्रमांक, कबड्डी संघाने द्वितीय क्रमांक आणि खोखो संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.

वैयक्तिक क्रिडाप्रकारात..मुलींमधून कु. स्वाती घाडी लांबउडी प्रथम,मुलींच्या खोखो संघातून. कु. रेणुका तोरगल, कु. शारदा गावडा यांची जिल्हापातळीवर निवड झाली.. मुलांमधून. कु श्रीनाथ कुऱ्हाडे गोळाफेक प्रथम, कु. प्रशांत वाणी पाच हजार मि. धावणे द्वितीय. कु. जोतिबा पाटील आठशे मी. धावणे द्वितीय,कु. श्रीनाथ कुऱ्हाडे आठशे मी. धावणे. तृतीय क्रमांक पटकावून चमकदार कामगिरी केली.

वरील विद्यार्थ्यांची जिल्हापातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्राचार्या शरयू कदम, क्रीडा प्रशिक्षक प्रा. शंकर गावडा,प्रा.संदीप पाटील, प्रा. डी व्ही पाटील प्रा.गुंडू कोडला यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते