खानापूर: गेल्या महिन्यात खानापूर आणि बेळगाव शहरात पार्क केलेल्या दुचाकी चोरणाऱ्या संशयिताला कित्तूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. बसवराज रुद्रप्पा गुड्डाकर (रा. गुरुवार पेठ, कित्तूर) असे संशयित चोरट्याचे नाव आहे.

कित्तूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण गंगोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी बसवराजला दोन दिवसांपूर्वी अटक केली आहे. खानापूर व बेळगाव येथील बसस्थानका जवळून दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली आहे. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याने इतर कुठे चोरी केली आहे का, याचाही तपास कित्तूर पोलिस करीत आहेत. kittur police
