खानापूर
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह 10 जणांविरुद्ध गुन्हा
बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण घोटाळाप्रकरणी विजयनगर पोलिस ठाण्यात बनावट कागदपत्र तयार करुन
मुडाची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व त्यांची पत्नी पार्वती यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाची फसवणूक करण्यासह बनावट कागदपत्रे तयार करुन भूखंड मिळविल्याचा आरोप सिद्धरामय्या यांच्यासह दहा जणांविरुद्ध करण्यात आला आहे. याप्रकरणात जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपनिबंधक आणि मुडा अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाची राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच बनावट कागदपत्रे तयार करुन भूखंड
मिळविल्याचा आरोप झाल्याने हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.
Karnataka cm