बातम्या

पॉक्सो प्रकरण: आता सीआयडीकडून येडियुरप्पा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

कर्नाटक सीआयडीने माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांच्याविरोधात पॉक्सो प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.

मार्च महिन्यात सदाशिवनगर पोलिसांनी भाजप नेत्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कर्नाटकचे पोलीस महासंचालक आलोक मोहन यांनी हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग केले.

येडियुरप्पा यांनी फेब्रुवारी महिन्यात डॉलर कॉलनीतील राहत्या घरी झालेल्या बैठकीदरम्यान मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येडियुरप्पा यांनी हा आरोप फेटाळून लावला असून माझ्याविरोधात षडयंत्र रचणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, असे म्हटले आहे.

येडियुरप्पा यांच्यावर आरोप करणाऱ्या 54 वर्षीय महिलेचा फुफ्फुसाच्या कर्करोगाने मे महिन्यात खासगी रुग्णालयात मृत्यू झाला होता.

या प्रकरणी सीआयडीने 17 जून रोजी येडियुरप्पा यांची सुमारे 3 तास चौकशी केली. कर्नाटक उच्च न्यायालयाने यापूर्वी या प्रकरणात सीआयडीला येडियुरप्पा यांना अटक करण्यापासून रोखण्याचे आदेश दिले होते.

Karnataka CID files chargesheet against Yediyurappa येडियुरप्पा

yediyurappa news, yediyurappa pocso case,CID case against yediyurappa,yediyurappa sexual assault case,,B. S. Yediyurappa,B. S. Yediyurappa pocso case,POCSO, B S Yediyurappa,B S Yediyurappa rape,B S Yediyurappa CM,B S Yediyurappa case,POCSO case,POCSO case karnataka

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते