नोकरी

अंगणवाडी सेविका व हेल्पर जागांसाठी अर्ज, शेवटच्या तारखेत वाढ

खानापूर : तालुक्यातील विविध गावांतील अंगणवाडी सेविका व मदतनीस(हेल्पर)पदांच्या रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट निश्चित करण्यात आली होती. मात्र महिला व बालकल्याण विभागाच्या सुधारित आदेशानुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 21 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे,

अशी माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी Women and Child Development यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

WCD Belagavi Recruitment 2024

नोकरीचे वर्णन
पदाचे नाव: बेळगाव जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस
अधिसूचना महिला व बालविकास विभाग
अधिसूचना दिनांक 2024-07-10
अंतिम दिनांक 2024-08-21
नोकरीचा प्रकार पूर्णवेळ
रोजगार क्षेत्र सरकारी क्षेत्र
वेतन तपशील रु. 6000 ते 10000 / महिना

कर्नाटक महिला व बालविकास विभागाने बेळगाव जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 313 पदे रिक्त असून त्यापैकी 61 कर्मचारी आणि 252 मदतनीस आहेत. याची संपूर्ण माहिती येथे दिली आहे.

पदनिहाय शैक्षणिक पात्रता

सेविका : पीयूसी पास. डीएसईआरटीमधून ईसीसीई पदविका अभ्यासक्रम/ जेओसी कोर्स/ एनटीटी अभ्यासक्रम आणि अंगणवाडी उपक्रमातील डिप्लोमा न्यूट्रिशन, होम सायन्स सर्टिफिकेट कोर्स, एक वर्षाचा नर्सरी किंवा पूर्व प्राथमिक प्रशिक्षण घेतलेल्यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार असून निवडीसाठी संबंधित व्यक्तींना बोनस +5 गुण देण्यात येणार आहेत.
सहाय्यक पद : एसएसएलसी किंवा समकक्ष पात्रता.

वयाची अट :
अर्ज करण्यासाठी किमान 19 वर्षे वय असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त वय 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.
इतर मागासप्रवर्ग 38 वर्षापर्यंत आणि एससी/एसटी/श्रेणी-1 प्रवर्गातील 40 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अपंगव्यक्तींसाठी वयोमर्यादा 10 वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा
– डब्ल्यूसीडी वेबसाइट “karnemakaone.kar.nic.in/abcd/ApplicationForm_JA_org.aspx” ला भेट द्या.
– खुल्या वेबपेजवर बेळगाव जिल्हा >> बालविकास प्रकल्प (तालुका) >> अधिसूचना क्रमांक >> पदासाठी पदनाम निवडा.
– ज्या अंगणवाडी केंद्रात अर्ज करायचा आहे ते निवडा आणि क्लिक करा.
– ऑनलाइन अप्लिकेशन वेबपेज ओपन होईल.
– मागितलेले सर्व तपशील अचूक देऊन अर्ज पूर्ण करा.
– विचारलेली कागदपत्रे स्कॅन करा, संबंधित नावाशेजारी असलेल्या अपलोड बटणावर क्लिक करा, अपलोड करा.
– अर्ज पूर्ण झाल्यानंतर पुढील संदर्भासाठी प्रिंट आऊट घ्या.

अर्ज करण्यासाठी जन्मदाखला/ एसएसएलसी/ पीयूसी गुणपत्रिका जन्मतारखेसह जन्मदाखला/ अधिवास दाखला/ शैक्षणिक पात्रता/ आरक्षणासंदर्भातील दाखला आणि विधवा व्यक्तीच्या बाबतीत पतीचा जातीचा दाखला/ आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीच्या बाबतीत उपविभागीय अधिकाऱ्यांकडून मिळालेला दाखला/ प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत प्रमाणपत्र/ घटस्फोटझाल्यास दाखला. अर्ज करताना सर्व लागू कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे.

WCD Belagavi Recruitment 2024 Apply For Anganwadi Helper / Worker Jobs

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते