खानापूर
करंबळच्या युवकाचा गोवा येथे अपघाती मृत्यू
खानापूर: करंबळ गावचे सुपुत्र श्री. नागेश गणपती घाडी सध्या राहणार गोवा यांचा मोठा चिरंजीव कुमार प्रशांत (सोन्या) नागेश घाडी याचा अपघाती मृत्यु झाला आहे.
काल 8 रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास MRF तिस्कार येथे दुचाकीवरून जाताना अपघात घडला त्यांनतर त्याला बांबोली दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पण रात्री 11.50 वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

प्रशांत याच्या अचानक जाण्याने करंबळ गावात शोककळा पसरली आहे.
