खानापूर

करंजगी गावच्या वेशीत हत्ती, मास्केनहट्टी भागात हत्तींचा वावर; शेतकऱ्यांचे जीवन धोक्यात | ಕರಂಜಗಿ ಸುತ್ತಮುತ್ತ ಆನೆಗಳ ಹಾವಳಿ; 15-20 ಆನೆಗಳ ಹಿಂಡಿನಿಂದ ರೈತರು ಕಂಗಾಲು.

खानापूर : खानापूर तालुक्यातील करंजगी, मास्केनहट्टी आणि बाळगुंद या गावांच्या परिसरात सध्या हत्तींच्या कळपाने मोठे थैमान घातले आहे. करंजगी येथील आप्पाराव सारोळकर यांच्या घरामागे एक हत्ती पोहोचल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या आठवड्याभरापासून जवळपास १५ ते २० हत्तींचा एक मोठा कळप या जंगलपट्ट्यात वावरत असून, उभी असलेली भात आणि ऊस पिके फस्त करत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

खानापूर तालुक्याच्या जंगलपट्ट्यात वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान ही दरवर्षीची समस्या आहे. गोधोळी, बाळगुंद, मास्केनहट्टी करजगी या भागात हतरवाड किंवा नागरगाळीच्या जंगलातून नेमकी सुगी सुरू झाली की हत्तींचा कळप दाखल होतो. मागील वर्षी पाच ते सहा हत्ती होते, मात्र यावर्षी कळपाची संख्या मोठी आहे. पाऊस कमी होताच हत्ती जंगलातून बाहेर पडतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. सध्या ऊस पीक तोडणीच्या उंबरठ्यावर असताना, या कळपाने मोठे नुकसान सुरू केले आहे. भात कापणी होण्यापूर्वीच नुकसानीला प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कळपातील आठ ते दहा पिले आणि दोन स्वतंत्र टस्कर हत्तींसह अनेक कळप दिवसाढवळ्या पिकांमध्ये घुसून नुकसान करत आहेत.

शेतकऱ्यांनी वर्षभर काबाडकष्ट करून पिकवलेले उभे पीक या हत्तींच्या कळपाणी नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ‘आता जगावे कसे’ असा गंभीर प्रश्न या भागातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. ‘खाणे कमी आणि नुकसान जास्त’ अशी परिस्थिती असल्याने येथील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

या गंभीर समस्येवर वनखाते कोणत्याही परिस्थितीत कळपांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना हाती घेत नाही, असा शेतकऱ्यांचा तीव्र आरोप आहे. राजकीय लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकारी केवळ निवेदनांची खैरात करत असले तरी, प्रत्यक्षात या हत्तीच्या बंदोबस्तासाठी कोणतीच पाऊले उचलली जात नाहीत. “जंगल वाचवण्याच्या नादात वन खात्याने शेतकऱ्यांना मात्र जिवंत मारण्याचा प्रकार अवलंबला आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक शेतकरी व्यक्त करत आहेत.

ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕು: ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಅರಣ್ಯ ಪಟ್ಟಿಯ ಸುತ್ತಮುತ್ತ, ನಿರ್ದಿಷ್ಟವಾಗಿ ಕರಂಜಗಿ, ಗೋಧೋಳಿ, ಬಾಳಗುಂದ ಮತ್ತು ಮಾಸ್ಕೇನಹಟ್ಟಿ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ವನ್ಯ ಪ್ರಾಣಿಗಳಿಂದ ಬೆಳೆ ನಾಶವಾಗುವುದು ಪ್ರತಿ ವರ್ಷದ ಸಮಸ್ಯೆಯಾಗಿದೆ. ಹತ್ತರವಾಡ ಅಥವಾ ನಾಗರಗಾಳಿ ಅರಣ್ಯದಿಂದ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಸರಿಯಾಗಿ ಕೊಯ್ಲು ಸಮಯ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತಿದ್ದಂತೆ ಆನೆಗಳ ಹಿಂಡು ಲಗ್ಗೆ ಇಡುತ್ತವೆ.

ಕಳೆದ ವರ್ಷ ಐದರಿಂದ ಆರು ಆನೆಗಳಿದ್ದವು, ಆದರೆ ಈ ಬಾರಿ ಆನೆಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ಮಳೆ ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತಿದ್ದಂತೆ ಆನೆಗಳು ಕಾಡಿನಿಂದ ಹೊರಬಂದು ಅಪಾರ ಪ್ರಮಾಣದ ಹಾನಿ ಮಾಡುತ್ತಿವೆ. ಸದ್ಯ ಕಬ್ಬಿನ ಬೆಳೆ ಕಟಾವಿಗೆ ಬಂದಿರುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಆನೆ ಹಿಂಡಿನಿಂದ ಭಾರೀ ನಷ್ಟ ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಭತ್ತದ ಕಟಾವು ಆರಂಭವಾಗುವ ಮೊದಲೇ ಬೆಳೆ ನಾಶವಾಗುತ್ತಿರುವುದರಿಂದ ರೈತರಿಗೆ ದೊಡ್ಡ ಆರ್ಥಿಕ ಹೊಡೆತ ಬಿದ್ದಿದೆ.

ರೈತರ ಹೇಳಿಕೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ಎಂಟು-ಹತ್ತು ಮರಿಗಳು ಮತ್ತು ಎರಡು ಪ್ರತ್ಯೇಕ ದಂತದ ಆನೆಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಂತೆ ಹಲವು ಆನೆ ಹಿಂಡುಗಳು ಹಗಲಿನಲ್ಲೇ ಕೃಷಿ ಭೂಮಿಗೆ ನುಗ್ಗಿ ಬೆಳೆಗಳನ್ನು ನಾಶ ಮಾಡುತ್ತಿವೆ. ಈ ಆನೆಗಳ ನಿರಂತರ ಉಪಟಳದಿಂದಾಗಿ ರೈತರು ತೀವ್ರ ಸಂಕಷ್ಟಕ್ಕೆ ಸಿಲುಕಿದ್ದಾರೆ.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या