कामतगा : नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेल्या गुंजी दुर्गामाता दौडीचे आज (२६ सप्टेंबर) कामतगा गावात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. गावकऱ्यांनी पारंपरिक वेशभूषेत, आरती करून जयघोषांच्या वातावरणात दौडीचे स्वागत करून गावात धार्मिक आणि भक्तीमय वातावरण निर्माण केले.
या वेळी उपस्थित भाजप नेते पंडित ओगले यांनी उपस्थितांना संबोधित करताना दुर्गामाता दौडीचा इतिहास तसेच संभाजीराव भिडे गुरुजी यांचे कार्य यांची माहिती दिली. दौडीत सहभागी झालेल्या धारकऱ्यांचा गावकऱ्यांनी मानाने स्वागत केले.
याचबरोबर,नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गुंजी माऊली मंदिरात उद्या (२७ सप्टेंबर) संध्याकाळी ८ ते १० या वेळेत कामतगा गावचा हरिपाठ व भजन कार्यक्र आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.