चंदगड जवळ अपघात, इटगीचा ट्रक चालक ठार
बेळगाव-वेंगुर्ला राज्य महामार्गावर चंदगड जवळील नागनवाडी (ता. चंदगड) येथे भीषण अपघात. या अपघातात ट्रकचालक जागीच ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. अर्जुन कत्याप्पा बडली (वय ५०, रा. इटगी, ता. खानापूर, जि. बेळगाव) असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे. Itgi’s truck driver killed in accident
यात ट्रकचालक जागीच ठार झाला
मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडीहून चंदगड मार्गे बेळगावच्या दिशेने चिरयाने भरलेला ट्रक भरधाव वेगाने जात होता. बेळगाव-वेंगुर्ला राज्य महामार्गावर चंदगड जवळील नागनवाडीजवळ बुधवारी (दि. 12) रात्री 10 वाजता समोरून येणारी कार टाळण्यासाठी एका ट्रकचालकाने ब्रेक लावला. ट्रक इतका भरधाव वेगात होता की कार चालकाच्या उजव्या बाजूला रस्ता सोडून उलटली आणि समोरून येणाऱ्या कारला धडकली. त्यामुळे ट्रक पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. यावेळी समोरून येणाऱ्या कारमधील दोघे जण जखमी झाले.
कारमधील प्रवासी बेळगाव येथून औषध घेऊन आपल्या गावी देवगडकडे जात होते. बुधवारी (दि. 12) रात्री दहा वाजता हा अपघात झाला असून ट्रकचालक अर्जुन कत्याप्पा बडली (वय 50, रा. इटगी, जि. खानापूर, जि. बेळगाव) जागीच ठार झाला. कारमध्ये जोत्स्ना संकेत लबडे (वय ५५) आणि विकास राऊत (दोघेही रा. देवगड, देवगड, जि. सिंधुदुर्ग) जखमी झाले.
Truck Falls Off Ghat In chandgad, Driver Killed
ट्रकचालकाचा मृतदेह ट्रकच्या केबिनमध्ये अडकला होता. गावातील तरुणांनी चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्री उशिरापर्यंत ट्रकचालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले नव्हते. गणेश भिकाजी कोयंडे (वय ४२, रा. देवगड, जि. देवगड, जि. सिंधुदुर्ग) यांनी याप्रकरणी चंदगड पोलिसठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास चंदगड पोलिस करीत आहेत.