देशभरातील 244 जिल्ह्यांमध्ये उद्या होणार मॉक ड्रिल, कर्नाटक या ठिकाणी मॉक ड्रिल
नवी दिल्ली – भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे, केंद्र सरकारने 7 मे रोजी देशभर मॉक ड्रिल आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर हा तणाव चांगलाच वाढला आहे. मॉक ड्रिलमध्ये नागरिकांना युद्ध परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत प्रशिक्षण दिले जाईल.
देशभरातील 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे. देशात यापूर्वी 1971 मध्ये मॉक ड्रिल करण्यात आले होते.
मॉक ड्रिल देशातील 244 सिव्हिल डिफेन्स डिस्ट्रिक्ट (नागरिक सुरक्षा जिल्हे) मध्ये होणार आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील नागरिकांना सुरक्षा नीती आणि नागरिक सुरक्षा उपयासंदर्भात जागरुक करण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. यासंदर्भात नागरिक सुरक्षा अधिनियम कायदा 1968 मध्ये संसदेत संमत करण्यात आला होता. हा कायदा संपूर्ण देशात लागू आहे. त्यानंतरही शत्रू राष्ट्राचे लक्ष असणारा भाग, संवेदनशील ठिकाणांचा समावेश त्यात करण्यात आला. त्यात 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याची योजना आहे. हे जिल्हे भारत आणि पाकिस्तान सीमारेषेच्या जवळपास आहे. त्यात जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरात, पंजाब सारख्या राज्यातील जिल्हे येतात.
नागरी संरक्षणाची उद्दिष्टे म्हणजे लोकांचे जीव वाचवणे, मालमत्तेचे नुकसान कमीत कमी करणे हे आहे. तसेच लोकांचे मनोबल उंचावणे आहे. युद्ध आणि आणीबाणीच्या काळात नागरी संरक्षण संघटना महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्यामध्ये ते अंतर्गत भागांचे संरक्षण करतात. सशस्त्रदलांना मदत करतात.
कसे वाजतात युद्धाचे सायरन?
आप्तकालीन परिस्थितीत सायरन वाजवले जातात. या सायरनचा आवाज खूप मोठा असतो. दोन ते पाच किलोमीटरपर्यंत त्याच्या आवाजाची रेंज असते. 120-140 डेसिबलपर्यंत त्याचा आवाज असतो. त्या आवाजात एक सायक्लिक पॅटर्न असतो. आवाज हळूहळू वाढते त्यानंतर कमी होत असते.
सायरन वाजल्यावर काय करावे?
सुरक्षित स्थळी जाऊन थांबावे
5 ते 10 मिनिटांत सुरक्षित स्थळी पोहचा.
सायरन वाजल्यावर घाबरुन जाऊ नका.
सायरन वाजल्यावर उघड्या जागेपासून दूर व्हा.
घर आणि सुरक्षित इमारतींमध्ये जाऊन थांबा.
टीव्ही, रेडिओ, सरकारी अलर्ट्सवर लक्ष द्या.
अफवांवर विश्वास ठेऊ नका. सरकारच्या निर्देशावर लक्ष द्या.
सायरन कुठे-कुठे वाजणार
कर्नाटक राज्यात या ठिकाणी वाजणार मॉक ड्रिलचा सायनर
बेंगळुरू: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत सरकारने कंबर कसली आहे. केंद्र सरकारने देशभरात मॉक ड्रिलचे आदेश दिले आहेत.काही राज्यांमध्ये मॉक ड्रिल आधीच आयोजित केल्या जात आहेत. दरम्यान, कर्नाटकमध्येही मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात बोलताना,अग्निशमन दलाचे डीजीपी प्रशांत कुमार ठाकूर म्हणाले की, उद्या बेंगळुरू, कारवार आणि रायचूर येथे मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत केंद्र सरकारकडून एक परिपत्रक जारी केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
शहरातील माध्यमांशी बोलताना अग्निशमन दलाचे डीजीपी प्रशांत कुमार ठाकूर म्हणाले, “उद्या दुपारी ४ वाजता बेंगळुरू, कारवार आणि रायचूर येथे मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेतला आहे.” याबाबत अग्निशमन दल आणि नागरी संरक्षण अधिकाऱ्यांसोबत आधीच बैठक झाली आहे.
मॉक ड्रिलमध्ये एनसीसी, एनएसएस, सिव्हिल डिफेन्स आणि डॉक्टर सहभागी होतील. पोलिस स्टेशन आणि अग्निशमन स्टेशनसह ३५ सायरन आहेत, त्यापैकी ३२ कार्यरत आहेत. त्यांनी सांगितले की, लोकांनी काय करावे आणि काय करू नये याबद्दल केंद्र सरकारकडून एक माहिती परिपत्रक जारी केले जाईल.
बेंगळुरूमध्ये ३५ सायरन आहेत आणि त्यापैकी ३२ चालू आहेत. म्हणून, जिथे सायरन वाजेल तिथे मॉक ड्रिल आयोजित केले जाईल. इंडियन इन्स्टिट्यूट, सीक्यूएएल, ईएसआय हॉस्पिटल, एनएएल, बंगळुरू डेअरी, कॅनरा बँक, एसआरएस पीन्या, व्हीव्ही टॉवर फायर स्टेशन, ज्ञानभारती फायर स्टेशन, थानिसंद्रा फायर स्टेशन, बनासवाडी फायर स्टेशन, यशवंतपूर फायर स्टेशन, बनशंकरी फायर स्टेशन, राजाजीनगर फायर स्टेशन, चामराजपेट फायर स्टेशन, कमर्शियल स्ट्रीट पोलिस स्टेशन, हलासुरु गेट स्टेशन, हलासुरु पोलिस स्टेशन, उपरपेट पोलिस स्टेशन, राजराजेश्वरी नगर पोलिस स्टेशन, कामाक्षीपालय पोलिस स्टेशन, केआर मार्केट पोलिस स्टेशन, व्यालिकवल स्टेशन, हलासुरु होमगार्ड मुख्यालय, पीन्या अग्निशमन स्टेशन, बंगळुरू ग्रामीण होमगार्ड ऑफिस, बंगळुरू फायर ब्रिगेड स्टेशन, अंजनपुरा अग्निशमन स्टेशन, आयटीपीएल फायर स्टेशन, सर्जापूर अग्निशमन स्टेशन, इलेक्ट्रॉनिक अग्निशमन स्टेशन आणि डेअरी सर्कल अग्निशमन स्टेशन.