हुबळी: नेहा हिरेमठ खुनाच्या तपासातून समोर आल्या काही गोष्टी…
हुबळी : येथील नगरसेवक निरंजन हिरेमठ Niranjan Hiremath यांची कन्या नेहा हिरेमठ हिच्या हत्येमागचे खर कारण काय आणि या हत्तेमध्ये कोणकोण सामील होते याचा तपास पोलीस करत असताना काही गोष्टी समोर आल्या आहेत.
नेहा हिरेमठ खून प्रकरणाचा तपास यापूर्वीच पूर्ण झाला असून पोलिसांनी 483 पानांचे आरोपपत्र सादर केले असून, सर्व समावेशक तपास करून मृत नेहा हिरेमठ आणि मारेकरी फयाज यांचा अहवाल सादर केला आहे.
फयाजवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) 302 (फाशी किंवा जन्मठेप), 341 (चुकीच्या पद्धतीने रोखणे), 506 (जीवे मारण्याची धमकी) अशा अनेक कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. या आरोपपत्रात फैयाज आणि नेहा यांच्यातील संबंधांची माहिती देण्यात आली आहे.
हुबळी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणारी नेहा हिरेमठ दुपारी परीक्षा देऊन कॅम्पसच्या बाहेर जात असताना आरोपी फयाज याने तिच्यावर चाकूने अनेक वार करून पळ काढला.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस सीआयडी CID अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात अनेक बाबींचा समावेश आहे. आरोपी फयाज नेहाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी जवळपास 99 साक्षीदार गोळा केले आहेत.
नेहाच्या हत्येचे मुख्य कारण प्रेम तर लव जिहाद नाही असे या चार्जशिट मध्ये सांगण्यात आले आहे. नेहा काही दिवसांपासून फयाजला टाळू लागली होती. नेहाने फयाजला लग्नासाठी सांगितल्याने त्याच्यापासून स्वत:ला दूर ठेवले होते. याचा बदला म्हणून फयाजने खून केल्याचे सांगितले आहे.
नेहाची हत्या होण्यापूर्वी फयाज याने दुकानातून खरेदी केल्याचे समजते. एकंदरीत प्रेम या विषयात एक निष्पाप जीव गेला आहे. आरोपी अजूनही जिवंत असल्याने आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
neha Hiremath murder case update
Hubli crime case