हलशीवाडी प्रायमरी शाळेचा अमृत महोत्सव होणार,विश्वभारती कला क्रीडा संघटनेला घवघवीत यश
खानापूर: सर्व सरकारी गव्हर्मेंट शाळा वाचवा आणि टिकवा
यानिमित्त एसडीएमसी कमिटी , शिक्षण प्रेमी खेळ प्रेमी यांच्यासोबत विश्वभारती कला क्रीडा संघटना संस्थापक अध्यक्ष अनिल देसाई माजी सैनिक यांची विचारांची देवाणघेवाण झाली. विषय शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सशक्त राहण्यासाठी योग कला व्यायाम विविध स्पर्धा क्रीडा संस्कृतीची आवड होणे या उद्देशावर दिनांक 03 सप्टेंबर 2024 रोजी मीटिंग सभा संपन्न झाली
यामध्ये अनिल देसाई बोलताना म्हणाले आपल्या शाळा टिकायला पाहिजे मातृभाषा मराठी असो कन्नड असो वृद्ध असो पालकांनी शाळेकडे ध्यान दिले पाहिजे व शाळेवर विविध प्रकारचे कार्यक्रम विविध स्पर्धा ठेवल्या पाहिजेत आणि शाळेमध्ये कार्यक्रम ठेवले पाहिजे
सगळ्यांनी मिळून विचारांची देवाणघेवाण करून अमृत महोत्सव करण्याचा गावकरी शिक्षणप्रेमी खेळप्रेमी यांनी चर्चा करून कार्यक्रम केला पाहिजे सगळ्यांनी आनंदात करू अशी इच्छा व्यक्त केली याप्रसंगी हलगी वाडी गावचे मान्यवर व एसडीएमसी कमिटी उपस्थितीत होती. अध्यक्ष विनायक देसाई, सुभाष देसाई ,पुंडलिक देसाई, विनोद म देसाई ,लहू देसाई, अरुण देसाई, परशराम लोहार, शंकर देसाई, नरसिंग देसाई, आदी मान्यवर उपस्थितीत होते.
गणेश चतुर्थी निमित्त माजी विद्यार्थी शिक्षण प्रेमी कमिटी गावकरी सगळ्यांची विचारांची देवाणघेवाण घेण्याकरता सात सप्टेंबर 2024 रोजी दुपारनंतर भव्य सभा हलशिवाडी जुन्या शाळेमध्ये होणार आहे तरी सर्व शिक्षण प्रेमींनी उपस्थितीत राहून लाभ घ्यावा अशी नम्र विनंती एसडीएमसी कमिटी अध्यक्ष श्रीमान विनोद देसाई यांनी आव्हान केले आहे.