हलगा येथे शिवजयंती उत्साहात साजरी
खानापूर तालुक्यातील हलगा गावात दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील ग्रामस्थ, माता-भगिनी आणि शिवप्रेमी युवक-युवती यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडला.


कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कल्लापा कृष्णाजी पाटील मेरडा, विनोद मनोहर वीर घोटगाळी, अप्पाना कल्लाप्पा फटाण, रणजित पाटील (ग्राम पंचायत सदस्य), सुनिल पाटील (ग्राम पंचायत सदस्य), सौ. मंदा फटाण (ग्राम पंचायत सदस्य), नरसिंग फटाण (माजी ग्राम पंचायत सदस्य), विठ्ठल गुरव (माजी टी.पी.), नागेशी गावडू पाटील, टी.ल. सुतार, राजू गुरव, महादेव गुरव, रवी रुपण, संतोष रुपण, गणपती पाटील, कमलाकांत फटाण, गंगाराम पाटील, विठ्ठल फटाण, सुनील गुरव, दर्शन पाटील, पुंडलिक पाटील, संदीप पाटील, अप्पाणा ईश्राण, गणेश फटाण, मोहन पाटील, गजानन सुतार, भरमाणी ईश्राण, विजय ईश्राण, महाबळेश्वर फटाण, मारुती फटाण, निवृत्ती फटाण, राहुल ईश्राण, जोतिबा बिस्टेकर व गावातील युवा कार्यकर्ते, माता-भगिनी उपस्थित होते.
या सोहळ्यात शिवाजी महाराजांच्या विचारांची महती सांगणारे प्रेरणादायी भाषण झाले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर सनदी यांनी केले.
🚩 प्रेरणास्थान, ऊर्जास्त्रोत – क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज 🚩
