खानापूर

खानापूर तालुक्यात आत्महत्येची घटना; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू

खानापूर तालुक्यातील निटूर ग्रामपंचायतीचे क्लार्क कम डाटा ऑपरेटर संजय लक्ष्मण कोळी (वय 45, रा. नागुर्डा) यांनी आपल्या शेतवडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

15 वर्षांपासून ग्रामपंचायतीत कार्यरत
संजय कोळी २००७ पासून निटूर ग्रामपंचायतीत क्लार्क कम डाटा ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. ग्रामपंचायतीतील सर्व डाटा ऑपरेटरची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने ते नेहमी मानसिक तणावाखाली राहत असल्याची चर्चा आहे.

घटनाक्रम:
बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांनी घरच्यांना “शेतीकडे जाऊन येतो” असे सांगून घर सोडले. मात्र, बराच वेळ होऊनही ते परतले नाहीत. कुटुंबीयांनी शोध घेतला असता, शेतात त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.

पोलिस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

कुटुंबाचा आधार हरपला
संजय कोळी यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते