खानापूर

ग्राम पंचायत रिक्त जागा भरण्यासाठी मतदानाची तयारी; २३ नोव्हेंबरला निवडणूक

बेळगांव: जिल्ह्यातील विविध कारणांनी रिक्त असलेल्या ग्राम पंचायत जागा भरण्यासाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासह, ४८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवडणूक वेळापत्रक जाहीर केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १२ नोव्हेंबर आहे. अर्जांची छाननी १३ नोव्हेंबरला होणार असून माघारीसाठी अंतिम तारीख १५ नोव्हेंबर निश्चित केली आहे.

मतदान प्रक्रिया २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. आचारसंहिता लागू झालेल्या भागांमध्ये कोणताही राजकीय प्रचार प्रतिबंधित असेल.

मतदान होणाऱ्या ग्राम पंचायतींची यादी

गुंजी, बिडी, जांबोटी, हलशी, हिरेमुनवळ्ळी, इटगी, घोटगाळी,मारिहाळ, होनगा, बस्तवाड, बेकिनकेरे, बेनकनहळ्ळी, संतीबस्तवाड, कंग्राळी खुर्द, मावनूर, घोडगेरी, शिरढाण, गुडस, केरूर, चंदूर, करोशी, नाईंग्लज, नेज, निडगुंदी, शिरूर, शिरहट्टी, अरटाळ, उडिकेरी, वण्णूर, गोवनकोप्प, मरकट्टी, मंगसुळी, मोळे, मुण्याळ, यादवाड, उनगर्णी, शेंडूर, कोगनोळी,  नंदगाव या ठिकाणी निवडणूक होणार आहे.

मृत्यू, राजीनामा, अपात्रता अशा विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या या जागांसाठी निवडणूक होत असून, कार्यकाळात शिल्लक राहिलेल्या तेरा ते चौदा महिन्यांसाठी या पदांवर निवड करण्यात येणार आहे.

               

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते