क्राईम

खानापूर मारुती नगर येथे घरफोडी, 10 तोळे सोने आणि 20 तोळे चांदी लंपास

खानापूर: येथील मारुती नगर येथे चार दिवसापासून बंद असलेल्या घराचा दरवाजा कुलूप तोडून 10 तोळे सोने आणि 20 तोळेे चांदी व 5000 ची रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली आहे.  घडलेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जुन्या पुलाजवळ असलेल्या मारुती नगर खानापूर येथे श्री.बसवंत वैजू निलजकर मुळगाव यडोगा यांनी 1 वर्षांपूर्वी बांधलेल्या नवीन घराचा मजबूत दरवाजा तोडून चोरांनी ही चोरी केली. बसवंत हे सैन्यात असतात आणि पत्नी निता मुलांना सुट्टी असल्याने गावाला गेल्या असलेले पाहून चोरांनी फायदा उठवला आहे. या चोरांनी दरवाजाला लहान होल करून आतून लॉक तोडले आहे.

या घटनेची नोंद खानापूर पोलिसात झाली असून पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. अधिक तपास सुरू आहे.

in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?