खानापूर
गोव्यातून कर्नाटकात दारू तस्करी प्रकरण: 74 लिटर दारूसह 18.5 लाखांचा मुद्देमाल जप्त


रामनगर: गोव्यातून कर्नाटकात तस्करी होत असलेली सुमारे अडीच लाख रुपये किमतीची 74 लिटर गोव्याची दारू जप्त करण्यात अनमोड अपकारी विभागाला यश मिळाले. या प्रकरणी मुकेश सिंग वास, राहणार उत्तर प्रदेश, या चालकाला अटक करण्यात आली आहे.

कारवाईदरम्यान दारू व वाहनासह एकूण 18 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अनमोड अपकारी निरीक्षक महेंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक टी. बी. मल्लनवर यांनी केली. यावेळी कर्मचारी महंतेस हुन्नूर, रवी शंकर नवर, बसवराज गुड्डेनवर, सदाशिव राठोड आणि इतर उपस्थित होते.

