खानापूर

गणेबैल टोल नाक्यावर पुन्हा दर वाढले, वाहनधारकांची लुट

Khanapur : बेळगाव-खानापूर राष्ट्रीय महामार्गावरील गणबैल ganebail टोलनाक्यावरील टोलमध्ये कालपासून वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला पुन्हा कात्री लागली आहे. या टोलनाक्यावर सहा महिन्यांत पुन्हा टोलकरात वाढ करण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. गणबैल टोलनाक्यावर नेहमीच मनमानी कारभार असतो. नुकतेच गणबैल टोलनाक्यावरील पासमध्ये राजकीय नेत्यांना देण्यात आलेल्या सवलती आणि त्यावरून सुरू असलेले आंदोलन ताजे असतानाच टोलप्लाझा कंपनीने अवघ्या आठ दिवसांत पुन्हा टोलवसुलीत वाढ केली आहे. या टोलनाक्यावर 24 तासांच्या परतीच्या प्रवासासाठी पूर्वी गाड्यांकडून केवळ 45 रुपये आकारले जात होते. आता त्यात 10 रुपयांची वाढ करण्यात आली असून आता 24 तासांच्या आत परतीच्या प्रवासासाठी 55 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे टेम्पो मालकांच्या दरात 20 रुपये तर ट्रक मालकांच्या दरात 45 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे खानापूर तालुक् यासह गणेशबैल प्लाझा परिसरातील वाहनधारकांमध्ये नाराजी पसरली आहे.

ganebail toll rate list

टोल नाक्यावर नवे दर • Ganebail Toll Old rate

गणेबैल टोल नाक्यावर छोट्या चारचाकी वाहनांसाठी पूर्वी एकतर्फी प्रवासासाठी 30 रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी 24 तासांत 45 रुपये आकारले जात होते. त्याचप्रमाणे टेम्पो व इतर वाहनांसाठी 45/70 रुपये, ट्रकसाठी 95/140 रुपये, बससाठी 105/160 रुपये, आठचाकी वाहनांसाठी 150/225 रुपये, तर बाराचाकीवाहनांसाठी 185/275 रुपये दर आकारण्यात आले.

टोल नाक्यावर नवे दर • Ganebail Toll New rate

या टोलनाक्यावर कालपासून कार वाहनासाठी एकेरी प्रवास 35 व दुहेरी प्रवासासाठी 45 रुपये, तर टेम्पो वाहनासाठी 60 रुपये दुहेरी प्रवासासाठी 90 रुपये, ट्रकसाठी 125/185 रुपये, बससाठी 135/200 रुपये, 8 चाकी साठी 195/290 रुपये बारा चाकी. 235/355 ची किंमत आकारण्यात येत आहे.

ganebail toll plaza contact number, Ganebail toll plaza contact number karnataka,

Ganebail toll plaza contact number khanapur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?