खानापूर
माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण यांच्या पत्नी अन्नपूर्णा चव्हाण यांचे निधन
खानापूर – स्टेशन रोड, खानापूर येथील रहिवासी आणि माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण यांच्या पत्नी अन्नपूर्णा विठ्ठलराव चव्हाण (वय 87) यांचे आज, रविवार, 23 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 6.30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 4.00 वाजता खानापूर येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कै. व्ही. वाय. चव्हाण यांच्या पत्नी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश चव्हाण यांच्या मातोश्री असलेल्या अन्नपूर्णा चव्हाण यांनी आपल्या पतींसोबत सीमा चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या निधनाने खानापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात चार मुले, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
