खानापूर

गाडी टोलवर थांबवून गाठले पोलीस स्टेशन, गणेबैल टोल नाक्याविरोधात तक्रार

खानापूर: आज शनिवारी खानापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेनेचे कर्नाटक राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील यांना गणेबैल टोल नाक्यावर मासिक पास असूनही खात्यावर निर्धारित रक्कम हवीच असे कारण पुढे करून अडविण्यात आले. त्यामुळे पाटील यांनी गाडी टोलवर तशीच थांबवून खानापूर पोलीस स्टेशन गाठले व गणेबैल टोल व्यवस्थापनाच्या विरोधात खानापूर पोलीस स्थानकात कायदेशीर तक्रार दाखल केली.

याबाबत के.पी. पाटील म्हणतात, नेहमीप्रमाणे बेळगावहून खानापूरला आज शनिवारी येत असताना टोल नाक्यावर गाडी अडवण्यात आली. तुमचा मासिक पास असला तरी काय झाले, तुमच्या खात्यावर निर्धारित रक्कम आवश्यक असल्याचे टोल नाक्यावरील कामगारांनी सांगितले. आपल्या खात्यावर निर्धारित रक्कम जमा करण्यासाठी संबंधित फास्टट्रॅक च्या खात्यावर रिचार्ज करण्यासाठी प्रयत्न केला पण तो झाला नाही. ही तांत्रिक अडचण त्या फास्टट्रॅगची होती. विनवणी करूनही वाहन सोडण्यात आले नसल्याने आपण खानापूर पोलीस स्थानकात नाक्याच्या या मनमानी कारभाराविरोधात तक्रार केली आहे. असे त्यांनी सांगितले.

वास्तविक मासिक पास असून सुद्धा गणेबैल टोलनाक्यावर लोकांची अडवणूक करण्याचा हा प्रकार म्हणजे मनमानी कारभार आहे. एकीकडे खानापूर तालुक्यातील काही बड्या नेत्यांची वाहने विनापास चालू आहेत, अशी यापूर्वी तक्रार झाली होती. या विरोधात खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसने खानापूर पोलीसात एफ आय आर देखील दाखल केली आहे. गणेबैल टोलनाक्यावर मनमानी सुरु आहे आणि हे साफ चुकीचे आहे या टोलनाक्यातील गैरकारभाराची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते