खानापूर तालुक्यातील माजी सैनिक संघटनेने असा साजरा केला स्वातंत्र्य दिन
खानापूर : माजी सैनिक आर्मी, नेव्ही व एअर फोर्स तालुका खानापूर संघटनेच्या वतीने जांबोटी क्रॉस येथील कार्यालयासमोर 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी 9 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष पांडुरंग मेलगे तसेच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे निवृत्त शिक्षक व राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री. आबासाहेब दळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्याध्यक्ष गोपाळ देसाई यांनी प्रास्ताविक केले व प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यानंतर सुभेदार शिवाजी चौगुले व नारायण झुंजवाडकर यांनी आपले विचार मांडले.
त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री. आबासाहेब दळवी यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की, सैनिकांचे कार्य फार मोठे असते. सैनिक कठीण परिस्थितीमध्ये सरहद्दीवर आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावत असतात आणि म्हणूनच देशात शांतता निर्माण असते.
याप्रसंगी आजी-माजी सैनिकांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अध्यक्ष आपल्या भाषणांमध्ये सर्वांना ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन पुढे बोलताना म्हणाले की, सरहद्दीवर देशाचे सैनिक कठीण परिस्थितीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावतात, त्यावेळी त्यांना अनेक समस्यांना सामना करावा लागतो. तसेच आपल्या शेजारील बांगलादेशमध्ये मोठी गडबड झालेली आहे, त्यामुळे हिंदू लोकांवर अनेक प्रकारचे अत्याचार होत आहेत त्यासाठी सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे असे उद्देशून सांगितले.
शेवटी प्रकाश गवसेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाला राजाराम पाटील, धाकलू हेब्बाळकर, तुकाराम पाटील, मल्लाप्पा पाटील, गणपती पाटील, रमेश कौंदलकर, यल्लाप्पा सागर, यशवंत देसाई, कृष्णा देसाई, विठ्ठल हुंदरे, साताप्पा गोरे, लक्ष्मण गुरव, चन्नेवाडकर विठ्ठल, राजाराम देवलकर, गोपाळ कडेमनी, परशराम गुरव, देवाप्पा पाटील, रामा बावकर, संदीप अंधारे, शिवानंद पाटील, विठ्ठल देवकर, रामचंद्र पाटील, राजाराम गुरव आदी उपस्थित होते.