
खानापूर: शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ यांच्या वतीने सोमवार, २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दुर्गामाता दौड आयोजित करण्यात आली आहे. या दौडीत युवक, युवती आणि महिलांचा मोठा सहभाग असतो.
दौडीची सुरुवात दररोज पहाटे ५.३० वाजता होईल आणि सकाळी ७.३० वाजता सांगता होईल. दौडीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गावात ‘शिवप्रतिष्ठान’चे कार्यकर्ते सक्रिय आहेत.
दौडीचा तपशीलवार मार्ग:
- सोमवार, २२ सप्टेंबर: श्री शिवस्मारक, निंगापूर गल्ली, श्री लक्ष्मी मंदिर, चिरमुरकर गल्ली, कडोलकर गल्ली, केंचापूर गल्ली, श्री चौराशी मंदिर, पारिश्वाड क्रॉस, दादोबानगर, बाजारपेठ, श्री संभाजी महाराज स्मारक, घाडी गल्ली, गुरव गल्ली, बस्ती गल्ली. सांगता: श्री कलमेश्वर मंदिर आणि श्री सातेरी माउली मंदिर.
- मंगळवार, २३ सप्टेंबर: शिवस्मारक, बुरुड गल्ली, न्यू नाईक गल्ली, समादेवी गल्ली, शिवमंदिर, होसमणी गल्ली, केंचापूर गल्ली. सांगता: श्री गणेश मंदिर.
- बुधवार, २४ सप्टेंबर: शिवस्मारक, रेल्वे स्टेशन, असोगा, मन्सापूर. सांगता: मारुती मंदिर.
- गुरुवार, २५ सप्टेंबर: शिवस्मारक, न्यू निंगापूर गल्ली, नागलिंगनकर नगर, घोडे गल्ली, श्री लक्ष्मी नारायण मंदिर, श्री स्वामी समर्थ केंद्र, श्री दत्त मंदिर, अर्बन बँक, श्री दुर्गादेवी, श्री राम मंदिर, भट गल्ली, हरीबोल मंदिर, पंचमुखी महादेव मंदिर, म्हारताळ मंदिर, श्री बालाजी मंदिर, श्री लक्ष्मी गदगा, चौराशी गल्ली. सांगता: चौराशी मंदिर.
- शुक्रवार, २६ सप्टेंबर: शिवस्मारक, मिशनरी कंपाऊंड, पोलीस क्वार्टर्स, श्री नागमंदिर, दुर्गानगर रोड, वाजपेयीनगर. सांगता: पीटीएस श्री दुर्गादेवी मंदिर.
- शनिवार, २७ सप्टेंबर: शिवस्मारक, आश्रय कॉलनी, श्री गणपती मंदिर हायवे, विद्यानगर, शाहूनगर, रेल्वे स्टेशन रोड. सांगता: श्री मारुती मंदिर.
- रविवार, २८ सप्टेंबर: शिवस्मारक, स्टेशन रोड, कलमेश्वर कॉलनी, श्री राम मंदिर फुलेवाडी, मुडेवाडी, चव्हाटा. सांगता: हतरगुंजी.
- सोमवार, २९ सप्टेंबर: शिवस्मारक, स्टेशनरोड, देसाई गल्ली, विठोबा मंदिर, चिरमुरकर गल्ली, बाजारपेठ, कडोलकर गल्ली. सांगता: श्री बसवेश्वर मंदिर.
- मंगळवार, ३० सप्टेंबर: शिवस्मारक, बसवेश्वर स्मारक, शिवाजीनगर रोड, श्री मारुती मंदिर, शिवाजीनगर, समर्थनगर, हलकर्णी, हुडको कॉलनी, गांधीनगर. सांगता: मन्याम्मा मंदिर.
- बुधवार, १ ऑक्टोबर: शिवस्मारक, स्टेशनरोड, मारुतीनगर, जुना कुप्पटगिरी रोड, कुप्पटगिरी. सांगता: श्री विठ्ठल मंदिर.
- गुरुवार, २ ऑक्टोबर: शिवस्मारक, स्टेशनरोड, भाजीमार्केट, निंगापूर गल्ली. सांगता: रवळनाथ मंदिर.