खानापूर
खानापूर: हलकर्णी दुर्गादेवी मंदिरात चोरी
खानापूर : हलकर्णी (ता. खानापूर) येथे मंदिरात चोरीची घटना घडली आहे. मंदिराच्या समोरचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून गाभाऱ्याच्या समोर असलेली दानपेटी फोडून त्यातील सर्व रक्कम लांबविली आहे. सदर घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

भाविकांनी देणगीच्या स्वरूपात जमा केलेली वीस ते तीस हजार रुपयाची रक्कम पेटीत होती, असा अंदाज आहे. खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. येथील दुर्गादेवी मंदिरात दानपेटीतील वीस हजार रुपयांहून अधिक रक्कम चोरट्यांनी लांबविली.
