माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
खानापूर: खानापर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर याचा वाढदिवस खानापूर नगरपंचायतीच्या कार्यालया समोर केक कापून साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधुन नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगाराना किटचे वितरण करण्यात आले.
यावेळी महिला अध्यक्षा सौ अनिता दंडगल म्हणाल्या की माजी आमदार डाँ.अंजलीताईनी खानापूर तालुक्यातील महिलाना चांगले व्यासपिठ दिले. केवळ चुल व मुल म्हणून घर सांभाळणार्या महिलाना माजी आमदार डॉ. अंजलीताईच्या पाठींब्यामुळे राजकरणाचे धडे मिळाले. त्यामुळेच तालुक्याच्या अनेक महिला राजकरणात सक्रिय झाल्या. ताई नेहमी आम्हाला पुढे होण्यास सांगत व तुमच्या पाठीशी पाठबळ दिले.
यावेळी ऍड. ईश्वर घाडी म्हणाले डॉ. अंजली निंबाळकर कोणत्याही पराभवाला खचून न जाता रणांगणात उतरून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन काँग्रेसचे विचार तळागाळात पोहोचविण्याचे काम त्या करत आहेत. महिलावर्गाला काँग्रेसची ध्येयधोरणे आणि समानतेचे, धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व समजून सांगण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. कारवार लोकसभा मतदारसंघातून त्यांना खासदारकीची उमेदवारी पक्षाने दिली. अवघ्या दोन महिन्यांमध्ये पाच लाखांच्या मतांचा पल्ला त्यांनी गाठला. संपूर्ण कारवार जिल्हा पिंजून काढला. यावरून त्यांच्या कामाची प्रचिती येते. त्यांचे पती हेमंत निंबाळकर वरिष्ठ पोलीस अधिकारी पदावर असूनही सुखकर जीवन जगता येणे शक्य असतानाही ते सर्व लाथाडून समाजसेवेत त्यांनी ईश्वर सेवा मानली आहे. त्यांच्या कार्य कर्तृत्वामुळे खानापूरच्या राजकारणाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
त्यांनी तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेऊन आपल्या आमदारकी काळात एमसीएच हॉ स्पिटल, हायटेक बस स्टॅण्ड, हेस्कॉम कार्यालय, पोलीस स्थानक, यासह शाळा वर्गखोल्या, अनेक गावांचे संपर्क रस्ते आणि पुलांची निर्मिती केली आहे. गेल्या दीड वर्षापासून खोळंबलेला विकासाचा रथ पाहिला तर डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची उणीव प्रकर्षाने जाणवते. असेही ते म्हणाले
यावेळी यशवंत बिरजे,चंबन्ना होसमनी, लक्ष्मण मादार, महादेव कोळी आधीनीं त्याच्या कार्याबद्दल गोड कौतुक केले.
यावेळी खानापूर तालुका कॉंग्रेस ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी ,महिला अध्यक्षा सौ अनिता दंडगल, सौ. वैष्णवी पाटील, अँड ईश्वर घाडी,नगरसेवक तोहिद चांदकन्नावर, लक्ष्मण मादार,चंबान्ना होसमनी, मधू कवळेकर, विनायक मुतगेकर,यशवंत बीरजे, प्रसाद पाटील, सुरेश जाधव, सुरेश दंडगल,गुंडू टेकडी, सुर्यकांत कुलकर्णी, ईश्वर बोबाटे, राजू पाटील, तसेच सावित्री मादार, दीप्पा पाटील, गीता अबरगट्टी आदी उपस्थित होते.