खानापूर

आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांना खानापूर जिजाऊ गणेशोत्सव मंडळाच्या आरतीचा मान

खानापूर: कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव Karnataka Health Minister Dinesh Gundurao हे आज खानापूर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या माता व बाल रुग्णालयाच्या इमारतीचा उद्घाटन आणि रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामाचा पायाभरणी समारंभासाठी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी डॉ अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या विनंतीस मान देऊन शिवस्मारक चौकातील जिजाऊ गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेतले व त्यांना आजच्या गणरायाच्या आरतीचा मान मिळाला.

जिजाऊ गणेशोत्सव मंडळाच्यावतीने सन्माननीय दिनेश गुंडूराव यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. अंजली निंबाळकर, गणेश मंडळांचे सर्व पदाधिकारी, कॉंग्रेस चे पदाधिकारी , गणेशभक्त, पत्रकार मंडळी  उपस्थित होते.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते