खानापूर
करंबळ येथे उद्या श्री धोंडदेव यात्रा
खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) गावातील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री धोंडदेव यात्रा शुक्रवार, दि. 14 रोजी होणार आहे. यात्रे निमित्त गावातील विविध देवदेवतांची मानकऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात येणार आहे.

त्यानंतर डोंगरावरील श्री धोंडदेवाची पूजा, ओटी भरणे, गार्हाणा घालणे बकऱ्याचा मान यासारखे धार्मिक विधी पार पडणार आहेत. यानंतर संध्याकाळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त डोंगरावर जत्रा भरणार आहे. याचबरोबर विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहेत.

या यात्रेला करंबळ तसेच पंचकृषितील माहेरवाशिणी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात, तसेच पंचक्रोशीतील भाविकही मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. ही यात्रा उद्या सकाळ पासून सुरू होणार असून भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

