खानापूर

आमदार विठ्ठल हलगेकर डीसीसी निवडणुक लढवण्यावर ठाम

खानापूर: तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे आहेत.  माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील व सध्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यात थेट सामना होणार आहे.

काल पालकमंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे विधानपरिषद सदस्य चंद्रराज हट्टीहोळी हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असून, गर्लगुंजी कृषीपथीचे संचालक राजू सिद्धानी यांनी देखील आमदार हलगेकर यांना पाठिंबा दर्शवला आहे. निवड समितीच्या वतीने आमदार हलगेकर यांची शिफारसही करण्यात आली आहे.

आज प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले :

“गेल्या काही वर्षांत अनेक सोसायट्यांकडून तक्रारी येत होत्या. अनेक शेतकऱ्यांना अजूनही शेअर्स मिळालेले नाहीत, कर्ज मिळालेलं नाही. काही ठिकाणी भ्रष्टाचाराचे प्रकार झाले, तर काही सोसायट्यांनी पाच वर्षांपासून पतपुरवठाच केलेला नाही. अशा परिस्थितीत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही निवडणुकीत उतरतोय.”

ते पुढे म्हणाले की, “आम्ही विरोधी पक्षाचे सरकार असतानाही लोकांच्या विकासासाठी प्रयत्न केले. मात्र संचालकांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे जनतेच्या न्यायासाठी ही निवडणूक आम्ही लढवत आहोत.”

हलगेकर यांनी गावकऱ्यांना आवाहन केले :

“खोट्या आश्वासनांना बळी न पडता आम्हाला मतदान करा. बहुसंख्य सोसायट्या आमच्या पाठीशी आहेत आणि आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा मला विश्वास आहे.”

📌 शेवटी त्यांनी सर्व मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या