खानापूर
खानापूरमध्ये ‘छावा’ चित्रपटाचे मोफत प्रदर्शन!
खानापूर : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, खानापूर यांच्या वतीने शनिवार, 1 मार्च 2025 रोजी रात्री 7.30 वाजता गुरव गल्ली, खानापूर येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाचे मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचा उद्देश धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची किर्ती सर्वांपर्यंत पोहोचण्याचा आहे. ज्यांना थिएटरमध्ये हा चित्रपट पाहता आला नाही किंवा जाणे शक्य झाले नाही, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
गावातील सर्व शिवप्रेमींनी आणि धारकरींनी या ऐतिहासिक चित्रपटाचा लाभ घ्यावा, अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.
