क्राईम

खानापूर बसमध्ये अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र लंपास

खानापूर :  बेळगावहून खानापूरला येताना बेळगांव येथील महिलेचे अडिज तोळ्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना घडली आहे. 

बेळगांव येथील वंदना सोनवलकर (वय 52, रा. शास्त्रीनगर) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे.

वंदना यांचे माहेर खानापूर असून 17 ऑगस्ट रोजी त्या गोगटे सर्कलमधून बसने खानापूरला निघाल्या होत्या. यावेळी त्यांनी
आपले मंगळसूत्र काढून सोबत असलेल्या बॅगेत ठेवले होते. निम्म्या रस्त्यात गेल्यानंतर त्यांनी मंगळसूत्र तपासून पाहिले असता बॅगेत ते नसल्याचे दिसून आले.
चार दिवस शोध घेऊन शुक्रवारी त्यांनी कॅम्प पोलिसांत जाऊन फिर्याद दिली.

गोगटे सर्कल ते झाडशहापूर दरम्यान चोरी झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?