खानापूर

मेगा भरतीला तालुक्यातील 250 हून अधिक बॅच लायसन्स चालकांची नोंदणी


खानापूर: येथील शांतिनिकेतन पब्लिक शाळेच्या मैदानावर बीव्हीजी कंपनीच्या वतीने बस चालक मेगा भरती आयोजित करण्यात आली होती. या मेगा भरतीला खानापूर तालुक्यातील जवळपास 250 हून अधिक बॅच लायसन्स असलेल्या चालकांनी आपली नोंदणी केली आहे.

खानापूर तालुक्यातील बॅच लायसन चालकांनी दिलेला प्रतिसाद लक्षात घेता उद्या मंगळवार दि. 6 ऑगस्ट रोजी देखील चालक नोंदणी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याचा खानापूर तालुक्यातील बॅच लायसन्स धारक चालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले आहे.


बीव्हीजी या कंपनीच्या वतीने आधुनिक पद्धतीच्या इलेक्ट्रॉनिक बसेस सुरू करण्यात आल्या असून या नवीन बसेस वर  पाचशे हून अधिक चालकांची भरती प्रक्रिया सदर कंपनीने आयोजित केले आहे.

तालुक्यातून सोमवारी दिलेल्या प्रतिसादाबद्दल कंपनीचे व्यवस्थापक संतोष, त्याचप्रमाणे गिरी यांनी अभिनंदन केले असून खानापूर तालुक्यातून जास्तीत जास्त युवकांना यामध्ये समाविष्ट केले जाईल अशी आश्वासन ही त्यांनी दिले.

यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी युवकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते