खानापूर
ट्रक आणि बसचा भीषण अपघात; बस ड्रायव्हर ठार, 15 प्रवासी गंभीर जखमी
बेळगांव – चंदगड तालुक्यात बेळगाव – वेंगुर्ला मार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसचालकाचा मृत्यू झाला असून बसमधील 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृत चालकाचे नाव लक्ष्मण हळदणकर असे असून त्यांच्या जागीच मृत्यू झाला.

अपघात इतका भीषण होता की बसचा पुढील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला असून ट्रकचाही पुढील भाग पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.