खानापूर

केंद्रीय अर्थसंकल्प 2025: 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आता करमुक्त! काय स्वस्त? काय महाग होणार?

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा वार्षिक अर्थसंकल्प Budget 2025 सादर केला. यावेळी सर्वसामान्य नोकरदार आणि मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा करत त्यांनी 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असल्याची माहिती दिली. याशिवाय, 75 हजार रुपयांची कर वजावट (Tax Deduction) पकडून आता 12 लाख 75 हजार रुपयांपर्यंत उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. budget 2025 india

Union Budget 2025
Union Budget 2025

नोकरदारांसाठी दिलासा

गेल्या काही दिवसांपासून करमुक्त उत्पन्न मर्यादा वाढवली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, 12 लाख रुपयांपर्यंत करमुक्त उत्पन्नाची घोषणा ऐकून अनेकांना विश्वासच बसत नव्हता. या निर्णयामुळे नोकरदारांच्या हाती आता अधिक रक्कम उरणार असून पगारातील कपात होणार नाही. त्यामुळे देशातील मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढण्याची शक्यता आहे.

मोठा गेमचेंजर ठरणारी घोषणा

गेल्या अनेक वर्षांमध्ये कोणत्याही सरकारने नोकरदारांसाठी इतकी मोठी कर सवलत दिलेली नव्हती. या निर्णयामुळे भाजपला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शहरी भागात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

जुनी आणि नवी करप्रणाली

जुनी करप्रणालीत 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 25 टक्के कर लागू होत असे. मात्र, नव्या करप्रणालीनुसार आता 24 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यासच 25 टक्के कर आकारला जाईल. त्यामुळे करदात्यांची मोठ्या प्रमाणावर नव्या करप्रणालीकडे वळण्याची शक्यता आहे.


नव्या करप्रणालीनुसार कराचे दर: Income Tax New Slabs

  • 0 ते 12 लाख: शून्य कर
  • 12 ते 16 लाख: 15 टक्के
  • 16 ते 20 लाख: 20 टक्के
  • 20 ते 24 लाख: 25 टक्के
  • 24 लाखांपेक्षा जास्त: 30 टक्के

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अनेक उत्पादनं आणि सेवांवरील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करात बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे काही वस्तू स्वस्त होतील तर काही महाग होण्याची शक्यता आहे.

काय स्वस्त होणार?

  • चामड्याच्या वस्तू: चामड्यापासून तयार होणाऱ्या वस्तू स्वस्त होतील.
  • इलेक्ट्रॉनिक वस्तू: स्मार्टफोन आणि मोबाईलच्या बॅटरी स्वस्त होतील.
  • इलेक्ट्रिक कार: इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी होतील.
  • कपडे: विणकरांनी विणलेले कपडे स्वस्त होणार आहेत.
  • एलईडी टीव्ही: स्मार्ट एलईडी टीव्हीच्या किमती कमी होतील.
  • औषधं: कर्करोगावरील तब्बल ३६ औषधे पूर्णपणे करमुक्त करण्यात आली आहेत. अनेक औषधांवरील कस्टम ड्युटी हटवली जाईल.
  • सागरी उत्पादने: फ्रोझन फिश पेस्ट आणि सागरी उत्पादनांवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे.
  • महत्त्वाचे घटक: कोबाल्ट, लिथियम आयन बॅटरी कचरा आणि जस्त यावरील प्राथमिक आयात शुल्क काढून टाकण्यात आले आहे.

काय महागणार?

  • फ्लॅट पॅनेल डिस्प्ले: यावर अधिक शुल्क लागू होणार आहे.
  • इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती घटक: काही उत्पादन घटकांवरील शुल्क वाढल्याने या वस्तू महाग होण्याची शक्यता आहे.

ग्राहकांना थेट फायदा What is the budget of 2025?

भारतात निर्मित होणाऱ्या स्मार्टफोन आणि एलईडी टीव्ही स्वस्त होतील. यामुळे ग्राहकांना थेट फायदा होईल. स्थानिक उत्पादन वाढल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती आणखी घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

whatsapp
whatsapp
Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते