खानापूर

गोव्यात नव्हे तर कांगोमध्ये घडली बोट बुडण्याची घटना, जाणून घ्या व्हायरल दाव्याचे संपूर्ण सत्य

फॅक्ट चेक  Fact Check: बुडणाऱ्या बोटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गोव्यातील असल्याचे सांगितले जात आहे. गोव्यात ओव्हरलोड स्टीमर बोट कोसळल्याने ६४ जण बेपत्ता असून २३ मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, आमच्या चौकशीत हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा ठरला.

सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक बोट समुद्रात बुडताना दिसत आहे. बोटीवर ही बरेच लोक दिसत असून हे लोक पाण्यात बुडताना दिसत आहेत.

काय आहे दावा? Boat Accident in Goa?

गोव्यात हा अपघात झाल्याचा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. या दुर्घटनेत 23 जणांचे मृतदेह सापडले असून 40 जणांना वाचवण्यात यश आल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय 64 जण बेपत्ता असल्याची ही माहिती आहे. ओव्हरलोडिंगमुळे प्रवाशांनी भरलेली बोट बुडाल्याचा दावाही केला जात आहे.

सत्य काय

हा व्हिडिओ कांगोमधील किवू सरोवरातील आहे येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत ७८ जणचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती प्रांतीय गव्हर्नरच्या हवाल्याने २ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात देण्यात आली आहे. congo boat capsized

काँगोमधील बोटीचा अपघात हा मध्य आफ्रिकन देशात झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात आहे. या अपघातात आतापर्यंत 78 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे अनेकदा लोक क्षमतेपेक्षा जास्त बोटींवर चढत असल्याच्या आणि नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी आहेत. पूर्व काँगोमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. गुरुवारी किवू सरोवरात 278 प्रवाशांची बोट उलटली. यामुळे आतापर्यंत 78 जणांना जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेनंतर 50 जणांना वाचवण्यात यश आले असले तरी अद्यापही मोठ्या प्रमाणात लोक बेपत्ता आहेत. lake kivu accident 78 death

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते