खानापूर: तालुक्यातील अती खराब रस्त्यांमुळे रोज एक ना एक अपघात घडत आहेत. असाच एक भयानक अपघात आज रुमेवाडी-हेम्माडगा रोड वर घडला आहे.

मिळालेल्या माहतीनुसार रुमेवाडी क्रॉस पासुन 1 किमी अंतरावर असलेल्या वळनाजवळ पडलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने जामगाव येथील युवकाची गाडी स्लिप झाली आणि हा अपघात घडला.

यामध्ये जामगाव येथील पुंडलिक अय्यर हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने खानापूर शासकिय रुग्णालयात दाखल करण्यास आले आहे.
