खानापूर

खानापूर भीमगड अभयारण्यात  विद्यार्थ्यांची जंगल सफर

खानापूर :कर्नाटक सरकारच्या वन विभागाच्या सहकार्याने आयोजित पर्यावरण जागरूकता उपक्रमाचा भाग म्हणून केएलएस आयएमईआर संस्थेच्या एमबीए तिसऱ्या सेमिस्टर मधील विद्यार्थी -विद्यार्थिनींनी खानापूर येथील भीमगड वन्यजीव अभयारण्याला नुकतीच भेट दिली.

सदर दौऱ्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासह त्यांना वनजीवनाचा अनुभव देणे हा होता. परिक्षेत्र वनसंरक्षणाधिकारी (आरएफओ) सय्यदसाब नदाफ यांनी विद्यार्थी -विद्यार्थिनींचे हार्दिक स्वागत केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना भीमगड अभयारण्याच्या विविध परिसंस्थेबद्दल विस्तृत ज्ञान दिले. यावेळी आरएफओ नदाफ यांनी खानापूर जंगलात राहणाऱ्या वन्य प्राण्यांच्या, झाडांच्या आणि वनस्पतींच्या विविध प्रजातींबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच पर्यावरणीय संतुलन राखण्यात आणि वन्यजीवांचे रक्षण करण्यात वन कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाची भूमिका विषद केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वनाधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत वनक्षेत्रातून फेरफटका मारला. जिथे त्यांना वन्य प्राण्यांच्या पाऊल खुणा दिसल्या आणि विविध प्रकारच्या झाडांशी भेटी घडल्या. केएलएस आयएमईआरचे अध्यक्ष, जीसी आर. एस. मुतालिक आणि संचालक डॉ. आरिफ शेख यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ही भेट आयोजित करण्यात आली होती. या दौऱ्याचे नेतृत्व डॉ. जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी केले. त्यांच्यासोबत सहाय्यक प्रा. सविता कुलकर्णी आणि सहाय्यक प्रा. रश्मी हर्ती होत्या. त्यांनी संपूर्ण दौऱ्यात विद्यार्थी -विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून त्यांना सुलभपणे वन संवर्धनाची सखोल समज करून दिली.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते