खानापूर

भीमगड पर्यटन क्षेत्र बनणार; स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना, दुर्गम भागात रोजगारनिर्मिती

खानापूर: भीमगड अभयारण्य सफारीची सोय करण्यात येणार असून खानापूर तालुक्यातील या निसर्गरम्य ठिकाणाला पर्यटकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. राज्य सरकार आणि पर्यटन विभागाच्या पुढाकाराने 18 किलोमीटरच्या जंगल सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे निसर्गप्रेमींना दाट जंगलाचा आणि वन्यजीवांचा रोमांचक अनुभव घेता येणार आहे.

भीमगड अभयारण्य निसर्गरम्य वनराईसाठी प्रसिद्ध आहे. येथे बिबट्या, साळींदर, हरिण, विविध प्रकारचे साप तसेच असंख्य पक्षी पाहायला मिळतात. जंगल सफारीच्या माध्यमातून पर्यटकांना या जैवविविधतेचा थेट अनुभव घेता येणार आहे. हे अभयारण्य पर्यावरण पर्यटनासाठी महत्त्वाचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे.

पर्यटन विभागाच्या सहसंचालक सौम्या बापट यांच्या माहितीनुसार, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अभयारण्य परिसरात विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. सफारी दरम्यान पर्यटकांसाठी मार्गदर्शक, सुरक्षा व्यवस्था आणि माहिती केंद्र उभारण्यात येणार आहेत.

जंगल सफरीमुळे पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनाचा संदेश पोहोचवला जाणार आहे. पर्यटकांनी जंगलात कचरा टाळणे, वनस्पती आणि प्राण्यांना हानी पोहोचवू नये यासाठी विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.

पर्यटनस्थळांच्या विकासामुळे स्थानिक व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. पर्यटकांची वाढ झाल्यामुळे हॉटेल, गाईड सेवा आणि स्थानिक हस्तकला उद्योगांना चालना मिळेल. विशेषतः दुर्गम भागातील हद्दीतील जनतेला रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

राज्य सरकारने भीमगड अभयारण्य आणि गोकाक फॉल्ससारख्या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी व्यापक योजना आखल्या आहेत. या प्रकल्पांमुळे बेळगाव जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे झळकणार आहे.

whatsapp
whatsapp
Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या