खानापूर

आयएएम इन्स्टिट्यूटतर्फे प्रा. मंजुनाथ दोडमने यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

बेळगांव: प्रा मंजुनाथ दोडमणी हे सध्या आरपीडी महाविद्यालयात भूगोलशास्त्राचे अध्ययन करत असून, प्रत्येक वर्षी 100% निकाल ते आपल्या विषयाचा देत असतात. त्याच सोबत विद्यार्थ्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी अनेक उपक्रम ते राबवत असतात. विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी त्यांची महाविद्यालयात ओळखं आहे.या सर्वांची दखल घेत. आयएएम इन्स्टिट्यूटतर्फे शिक्षक दिनानिमित्त प्रा. मंजुनाथ दोडमने यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले.

यावेळी प्रमूख पाहुणे म्हणुन पदवीपूर्व शिक्षण विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी एम. एम. कांबळे, पदवीपूर्व महाविद्यालय प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष रवी एस. पाटील, सरदार्स कॉलेजचे प्राचार्य वाय. एम. पाटील, गौडेश एस. पाटील, सौम्या जी. पाटील यांच्या हस्ते उपस्थित शिक्षकांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी गीता बसण्णावर, अंकुश घाग, अनुराज बैलहोंगल, राजशेखर कोळ्ळीमठ यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते