खानापूर
दहावी-बारावी पाठोपाठ पहिली ते नववी परीक्षा वेळापत्रक जाहीर
बेळगाव: जिल्ह्यातील शाळा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा मार्च महिन्यात घेतल्या जाणार आहेत. जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या निर्णयानुसार, आठवी आणि नववीच्या परीक्षा 5 मार्चपासून सुरू होतील, तर पहिली ते सातवीच्या परीक्षा 18 मार्चपासून होणार आहेत.

बारावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार असून, दहावीच्या परीक्षेला 21 मार्चपासून प्रारंभ होईल. याचदरम्यान शालांत परीक्षाही घेतल्या जातील. मार्च अखेरपर्यंत पहिली ते नववीपर्यंतच्या सर्व परीक्षा पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
प्राथमिक व माध्यमिक परीक्षा वेळापत्रक:
- पहिली ते पाचवी:
- 18 मार्च – प्रथम भाषा
- 19 मार्च – द्वितीय भाषा
- 20 मार्च – गणित
- 21 मार्च – पर्यावरण शिक्षण
- 22 मार्च – शारीरिक शिक्षण
- सहावी व सातवी:
- 18 मार्च – शारीरिक शिक्षण व कला
- 19 मार्च – प्रथम भाषा
- 20 मार्च – द्वितीय भाषा
- 21 मार्च – तृतीय भाषा
- 22 मार्च – गणित
- 24 मार्च – विज्ञान
- 25 मार्च – समाज विज्ञान
- आठवी व नववी:
- 5 मार्च – शारीरिक शिक्षण, चित्रकला
- 6 मार्च – प्रथम भाषा
- 7 मार्च – द्वितीय भाषा
- 8 मार्च – तृतीय भाषा
- 10 मार्च – गणित
- 11 मार्च – विज्ञान
- 12 मार्च – समाज विज्ञान
यासह, आठवी आणि नववीला शिकवणाऱ्या शिक्षकांवरच दहावीच्या परीक्षांसाठी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परीक्षा वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अभ्यासाला गती दिली आहे.

