खानापूर
चोर्ला घाटात ट्रक अपघातामुळे वाहतूक कोंडी
कणकुंबी: कर्नाटक-गोवा सीमेजवळील चोर्ला घाट येथे आज दिनांक 11 जानेवारी दुपारनंतर मागील आठवड्यात झालेल्या एका भीषण अपघातावेळी दरीत कोसळलेल्या ट्रकला बाहेर काढताना घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
स्थानिक प्रशासन आणि पोलिस दल घटनास्थळी पोहोचले असून, गाडी काढायचे काम सुरू आहे.
वाहनचालकांना आणि प्रवाशांना या मार्गावरून जाण्यापूर्वी स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्याची परिस्थिती: सध्या गाडी काढायचे काम सुरू असून वाहतूक सुरळीत होत आहे.
