खानापूर

बीसीए शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगावच्या वसतिगृहात घडली घटना

बेळगाव : बीसीए शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बेळगावच्या महांतेश नगरमधील समाजकल्याण वसतिगृहात घडली आहे.

शिल्पा यरमसणाळ (वय 20) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती हावेरी जिल्ह्यातील शिग्गावची रहिवासी असून बेळगावमधील संगोळी रायण्णा कॉलेजमध्ये बीसीएच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती.

वसतिगृहातील पाचव्या खोलीत तिने गळफास घेतला असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून तपास करत आहेत.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते