खानापूर
अनमोड घाटात दरड कोसळण्याचा इशारा, रस्ता खचला
अनमोड: घाटात दूधसागर मंदिराजवळील घाटमाथ्यावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गाजवळ सुमारे 50 मीटर क्षेत्रात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भेगांमुळे कोणत्याही क्षणी भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या ठिकाणी दरड कोसळल्यास महामार्ग पूर्णपणे बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या सुरक्षेच्या दृष्टीने पॅकेट टाकून वाहतूक सुरू ठेवण्यात आलेली असली, तरी या मार्गे येणारी-जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर अडकत असून, वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
विशेषतः जोरदार पाऊस सुरू असल्याने, कोणत्याही क्षणी दरड कोसळू शकते आणि त्यामुळे महामार्ग बंद पडण्याचा संकटजनक प्रसंग ओढवू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या रस्त्याने प्रवास करत असाल तर सावधगिरीने प्रवास करावा असा इशारा देण्यात आला आहे.